परिपूर्ण
मनोरंजनकर्ता – अमेय डबली यांच्या समृद्ध सांगीतिक प्रवासाने प्रेक्षक मंत्रमुग्ध, सशस्त्र दलाच्या नि:स्वार्थ सेवेप्रती आदर व्यक्त करण्याचा उद्देश ~
मनोरंजनाचा बादशाह आणि सुखद भारतीय संगीताला प्रतिशब्द म्हणजे अमेय डबली! त्यांच्या संगीतमय जलशाचा अनुभव अलीकडेच बिर्ला मातुश्री सेंटर येथे आला.
आपल्या देशासाठी प्रसंगी जीवाची बाजी लावून आत्म्याचे समर्पण करणाऱ्या वीर
जवानांकरिता संगीताचा वरदहस्त लाभलेल्या अमेय यांनी याठिकाणी सांगीतिक प्रस्तुती
केली. यावेळी एकम सत्त फाउंडेशनच्या वतीने आर्मी कमांडर, सदर्न कमांड महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा ले. जन एस के प्रशर, एव्हीएसएम, व्हीएसएम आणि त्यांच्या
सहकाऱ्यांचा, त्यांनी नागरिकांच्या संरक्षणास्तव घेतलेल्या परिश्रमाकरिता गौरव
करण्यात आला. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोवा राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीत 125
कोटी भारतीयांच्या वतीने या वीरांनी गरजूंना मोठे साह्य पुरवले होते.
मनाला
शांत करण्यासाठी, संगीताची प्रसन्नता अनुभवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एकम
सत्त’चे प्रमुख ध्येय राष्ट्रासाठी- एक सत्य, एक माणुसकी विश्व संगीत ("Ekam Satt Mission for Nation - One Truth, One
Humanity World Music") असे आहे. श्री अमेय डबली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या आत्मिक सुख देणाऱ्या
या प्रस्तुतीतून हे दिसून येते. या सांगीतिक जलशात सर्वोत्तम सुफी, लोकसंगीत आणि समकालीन वैश्विक संगीताच्या कलाकृती
सादर करण्यात येतात. कबीरदास, मीराबाई, गुरू नानक, बुद्ध, ख्वाजा, अमीर खुसरौ, तुलसीदास, बायबलमधील शिकवण आणि
आत्म्यार्यंत पोहोचणाऱ्या संगीतात समरसून जाण्याची संधी यावेळी प्रेक्षंकाना
अनुभवता आली. यापैकी काही रचनांनी पायाचा ठेका धरायला भाग पाडले तर काही मनात
रुंजी घालत राहिल्या, तर काहीनी थेट हृदयाचा
ठाव घेतला. संगीत हे असे माध्यम आहे, ज्याला कोणत्याही
सीमा-सरहद्दीच्या, सामाजिक मर्यादांचे पाश नसतात. संगीत हे समाजात शांतता
प्रस्थापित करू शकते. आपल्या सशस्त्र दलाच्या जवानांना काही काळ शांतीचा अनुभव
लाभावा हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
अमेय
डबली आणि त्यांच्या तरबेज, कौशल्यसंपन्न टीमच्या
मेहनतीने जलशाची संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. या आनंदमय उपक्रमाच्या अनुषंगाने
सर्वोत्तम संगीत मनोरंजन आणि सामाजिक भान एकाच ठिकाणी आणले. एचपीसीएल, एलआयसी आणि न्यू इंडिया अॅश्यूरन्स सारख्या कॉर्पोरेट्सनी दिलेल्या बिनशर्त पाठबळाने हा इवेंट प्रत्यक्षात साकारणे शक्य झाले.
सामाजिक
भानाची जाणीव आणि मानव कल्याणाला एकम सत्त फाउंडेशन आणि एडी वेंचर्सचे प्राधान्य
असून, अमेय डबली आणि पूर्वी सोआली हे त्यांचे प्रमुख आहेत. अमेय डबली आणि त्यांचा
बँड देशात जवानांकरिता सादरीकरण करत असून, आजवर 47 प्रस्तुतींसह ते 2 लाख जवान आणि
त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या कामासाठी दिग्गजांकडून कौतुक तर
झालेच, शिवाय बऱ्याच प्रेक्षकांकडून शाबासकी मिळाली!
एव्हीएसएम, व्हीएसएम ले. जन. एस के प्रशर म्हणाले की, “मी अमेय डबली आणि त्यांच्या एकम सत्तमधील संपूर्ण
टीमचे आभार मानतो, त्यांनी मोठ्या कार्यक्षमतेने संपूर्ण जलशाचे आयोजन केले. मागील
40 वर्षांमध्ये मी बरेच सांगीतिक जलसे पाहिले आहेत, परंतु इतके अद्भूत सादरीकरण
अनुभवले नव्हते. या कार्यक्रमाने मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतला,
त्यांना हा कार्यक्रम पाहताना जी मजा आली, त्यातून हा भाव व्यक्त
झाला. आर्मीने महाराष्ट्रातील पूरस्थितीत जे साह्य केले, तो आमच्या राष्ट्राप्रती कर्तव्याचा भाग होता. मात्र
तुम्ही जे सशस्त्र दलाकरिता केले, त्याची प्रशंसा करावी
तितकी थोडी आहे. आम्हाला थेट हृदयापासून सादर करण्यात आलेल्या देशभक्तीपर, सुफी आणि भक्तीमय गीतांच्या मिश्र रचनांनी मंत्रमुग्ध
केले.”
यावेळी अमेय डबली म्हणाले की, “आयुष्य अल्पकाळाचे आहे, आपल्यापैकी प्रत्येकाने अस्सल सुख आणि आनंदाचा मार्ग
शोधणे फार आवश्यक आहे, हा मार्ग स्वत्वात असतो!
प्रामुख्याने सशस्त्र दलाविषयी बोलायचे झाल्यास, आपल्या शिस्तशीर
जीवनशैलीद्वारे वातावरणातील आव्हाने जवान पेलतात, मोठ्या जनसमुदायासोबत संवाद
साधण्याची किंवा संपर्कात येण्याची संधी त्यांना खचितच मिळते. ‘एकम सत्त – मिशन
फॉर नेशन’ म्युझिक कॉन्सर्ट टूर हा एक नम्र प्रयत्न आहे, संगीताच्या माध्यमातून आणि आपल्या भाऊबंदांसमवेत
जवानांच्या आयुष्यातील तणाव हलका करण्याचा!”
Comments
Post a Comment