‘डीआयडी’मध्ये मलायका अरोराने तब्बल 21 वर्षांनंतर निर्माण केली ‘छैंय्या छैंय्या’ची जादू



‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स’ या सर्वात मोठ्या गुणवत्ता शोध कार्यक्रमातील 11 स्पर्धकांनी आपल्या अप्रतिम कामगिरीने प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करण्यास प्रारंभ केला आहे. बॉलीवूडची सुपरस्टार रूपसुंदर अभिनेत्री करीना कपूर-खान, नृत्याचा महान गुरू बॉस्को मार्टिस व भारतातील सर्वात लोकप्रिय रॅपर रफ्तार यांनी या कार्यक्रमात परीक्षकाचे काम स्वीकारले असून त्यांच्यातील खेळीमेळीचे नाते आणि सूत्रसंचालक करण वाही याच्या चेष्टेखोर टिप्पण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाचा वाढीव डोस मिळणार आहे कारण या भागात बॉलीवूडची रूपसुंदर अभिनेत्री मलायका अरोरा ही करीना कपूर-खानच्या जागी परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. सर्वच स्पर्धकांनी या नृत्याच्या सम्राज्ञीवर आपला प्रभाव टाकण्यासाठी उत्कृष्ट नृत्ये सादर केली, तरी किंग्ज स्क्वाडने मलायकाच्या अत्यंत गाजलेल्या छैंय्या छैंय्या या गाण्यावर केलेल्या नृत्याने मलायका अतिशय भारावून गेली. तिच्या हसर्‍्या चेहर्‍्याकडे पाहून अनेकांच्या या गाण्याशी जोडलेल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. यावेळी या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेलचे काही किस्से मलायकाने सर्वांना सांगितले.

मलायका अरोरा म्हणाली, “कोणीही कधीही छैंय्या छैंय्या हे गाणं गायलं की मी जुन्या स्मृतींमध्ये हरवून जाते. मला या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळच्या सर्व गोष्टी आठवतात. या गाण्याचं चित्रीकरण कसं केलं, तिथपासून ते मी किती वेळा ट्रेनच्या छतावर पडले होते, तिथपर्यंत सर्व गोष्टी मला चांगल्याच आठवतात. मी छैंय्या छैंय्या हे गाणं कधीच विसरणार नाही कारण मोठ्या पडद्यावर एका गाण्यावर मी प्रथमच नृत्य केलं होतं. त्यावेळी तिथे शाहरूख खान, मणिरत्नमसर, संतोष सिवन यासारखे सुपरस्टार होते. त्यावेळी मी स्वत:ला इतकी छोटी समजत होते कारण तोपर्यंत या सर्वांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही मिळवलं होतं. पण तरीही त्या सर्वांनी मला त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखा मान दिला. मी एक अगदी नवोदित असून मी प्रथमच काही तरी करण्यासाठी घराबाहेर पडले आहे, असं त्यांनी मला एक क्षणही वाटू दिलं नाही. त्या सर्वांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं की मला माझ्या घरच्यांची एकदाही आठवण आली नाही.”

आपले पहिलेच गाणे चालत्या ट्रेनच्या छतावर चित्रीत करण्यातील आव्हानांबद्दल बोलताना तिने संगितले, “या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना मी अनेकदा खाली पडले. जोरदार वार्‍्यामुळे मी सतत डावीकडे आणि उजवीकडे हलत असे त्यामुळे त्या टीमने माझ्या घागर्‍्यातून कमरेला एक दोर बांधला. त्यामुळे मला ट्रेनच्या वेगाशी जुळवून घेता येऊ लागलं. दुर्दैवाने मी नंतर जेव्हा हा दोर सोडला, तेव्हा हा दोर माझ्या कमरेत घुसला होता आणि त्यातून रक्त येऊ लागलं. ते पाहिल्यावर सर्वजण घाबरले. पण याचमुळे मला जाणवलं की हे सर्व कर्मचारी आणि कलाकार माझी किती काळजी घेत होते. त्यांनी माझी उत्तम काळजी घेतली- कोणी माझे पाय चेपत होतं, तर कोणी मला खायला आणून देत होतं. काहीजण मला काळजी न करण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला देत होते. या गोष्टी मी कधीच विसरणार नाही कारण ते सर्वजण माझे कुटुंबीयच होते. ही आठवण मी अखेरपर्यंत लक्षात ठेवीन.”

अगं मलायका, इतका संघर्ष केल्यावरही तू एक अभिजात कलाकृती आम्हाला दिली आहेस!
याशिवाय या भागात प्रेक्षकांना वर्ल्ड डान्स चॅम्पियन्सचा किताब मिळविलेली किंग्ज स्क्वाड ही टीम बोलो हर हर या गाण्यावर नृत्य करताना पाहायला मिळेल. एक स्पर्धक मानसी धृवने ऑन्टीजी  या गाण्यावर जबरदस्त नृत्य करून सर्वांवर प्रभाव टाकला. इतका की परीक्षक मलायका अरोरा आणि बॉस्को मार्टिस यांनीही व्यासपिठावर येऊन तिच्याबरोबर या गाण्यावर नृत्य केले.

ही सर्व धमालमस्ती, संस्मरणीय क्षण आणि असामान्य नृत्याविष्कार पाहण्यासाठी पाहात राहा ‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स’च्या शनिवार-रविवार रात्री 8.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!


Comments